DGP Rashmi Shukla
sakal
पुणे/घोरपडी - ‘तुम्ही केलेली मेहनत, चिकाटी, प्रामाणिकपणा व संघभावना खरोखर आदर्श आहेत. या स्पर्धांमधून केवळ शारीरिक ताकद किंवा शौर्यकौशल्य नव्हे, तर धैर्य आणि जनतेच्या सेवेसाठीची सदैव तत्परता अधोरेखित झाली आहे. हे प्रयत्न महाराष्ट्र पोलिस दलाची परंपरा अधिक भक्कम करतात,’’ असे प्रतिपादन राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी केले.