Hari Narke: कलामांना महात्मा फुले कोण माहीत नव्हतं? नरकेंच्या पोस्टमुळे नवा वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abdul Kalam and Hari Narke

Hari Narke: कलामांना महात्मा फुले कोण माहीत नव्हतं? नरकेंच्या पोस्टमुळे नवा वाद

पुणे - प्राध्यापक हरी नरके यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे. माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त देशभरात वाचन प्रेरणा दीन साजरा केला जातो. मात्र अब्दुल कलाम यांचे राष्ट्रपती होण्यासाठी काय योगदान आहे ? असा सवाल करत हरी नरके यांनी पोस्ट केली आहे. त्यांची ही पोस्ट जुनी आहे. मात्र आता व्हायरल झाली आहे. (Hari Narke facebook post viral on APJ Abdul Kalam )

हेही वाचा: MNS : राज ठाकरेंना कोर्टाचा मोठा झटका; 'त्या' गुन्ह्यातून मुक्तता करण्यास नकार

कलाम यांनी किती पुस्तके वाचली आणि कोणता ग्रंथसंग्रह केला होता ? असा सवाल हरी नरके यांनी उपस्थित केलाय. अब्दुल कलाम इंजिनियर होते पण लोकांनी त्यांना शास्त्रज्ञ करून टाकले. मिसाईलचां शोध जर्मनीत लागला तेव्हा अब्दुल कलाम पाळण्यात होते असही नरके म्हणाले.

फेसबुक पोस्टमध्ये नरके यांनी संसदेत बसवण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याबाबतच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्याबाबत ते म्हणाले की, संसदेच्या प्रांगणात महात्मा फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण होणार होते. त्यासाठी आम्ही तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना आमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी कोण महात्मा? असं विचारून कार्यक्रमाला येण्यास त्यांनी थेट नकार दिला होता. त्यांचे वाचन, सामान्य ज्ञान एवढे थोर होते की, त्यांना महात्मा फुले कोण होते, हेही माहित नव्हतं, असंही नरके यांनी नमूद केलं.

हेही वाचा: Raj Thackeray : पुण्यासह मुंबईत मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार?

कलाम यांनी गरिबीत दिवस काढले. त्यांचे आत्मचरित्र वाचनीय आहे. मात्र ते सतत प्रकाशझोतात राहणारे शासकीय अधिकारी होते. हिंदुत्ववाद्यांचे ते खास होते. त्यामुळेच त्यांना भारतरत्न आणि राष्ट्रपतीपद मिळाल्याचंही नरके यांनी नमूद केलं.

टॅग्स :APJ Abdul KalamHari narke