

PNE26W61555
सोलापूर : विजेत्या संघासह उपस्थित शिक्षकवृंद व मान्यवर.
प्रथमेशच्या ४२ धावा; हरिभाई देवकरण पुन्हा चॅम्पियन!
संगमेश्वरचा डाव ५७ धावांत गुंडाळला; पाच षटकांतच विजेतेपदावर शिक्कामोर्तब
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २५ : प्रथमेश लोंढेच्या नाबाद ४२ धावांच्या जोरावर हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाने १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात संगमेश्वर महाविद्यालयाला ५७ धावांत रोखल्यानंतर हरिभाई देवकरणने अवघ्या पाच षटकांत लक्ष्य गाठले. या विजयामुळे संघाची पुणे विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि सोलापूर महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संगमेश्वर महाविद्यालयाने १० षटकांत नऊ गडी गमावून ५७ धावा केल्या. सोहम कुलकर्णीने १७, तर विजय घोडकेने १५ धावा केल्या. हरिभाई देवकरणकडून प्रथमेश लोंढेने दोन षटकांत तीन धावा देत तीन बळी घेतले. चिराग टंकने दोन षटकांत दहा धावा देत दोन बळी मिळवले.
प्रत्युत्तरादाखल हरिभाई देवकरणने पाच षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात ५७ धावा केल्या. प्रथमेश लोंढेने नाबाद ४२, तर आदित्य तमनुरने सहा धावा केल्या. संघाला क्रीडाशिक्षक प्रमोद चुंगे, अक्षय गवळी आणि प्रकाश कंपली यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.