हरिश रावत पदत्याग

हरिश रावत पदत्याग
Published on

काँग्रेस पक्षाच्या पदांचा
हरिश रावत त्याग करणार

स्वीय सहायकाच्या घरातून रोकड जप्त झाल्यान निर्णय

देहराडून, १२ (पीटीआय) : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या स्वीय सहायकाच्या घरावरील छाप्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रोकड आणि महागडी घड्याळे जप्त केली. त्यानंतर रावत यांनी शनिवारी पक्षातील सर्व पदांवरून पायउतार होण्याची घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रचारावर या प्रकरणाचा परिणाम होऊ नये, यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे रावत यांनी सांगितले.

‘ईडी’ने गुरुवारी केलेल्या छापेमारीत रावत यांचे स्वीय सहायक चंदनसिंह जिना यांच्या निवासस्थानातून डझनभर महागडी मनगटी घड्याळे आणि ३२ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. जिना यांनी २०१४ ते २०१७ या काळात रावत यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात विशेष कर्तव्य अधिकारी म्हणूनही काम केले होते. राज्य सेवा निवड आयोगाने २०१६ मध्ये घेतलेल्या भरती परीक्षेतील कथित गैरप्रकारांशी संबंधित अवैध आर्थिक व्यवहारप्रकरणी तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे.

समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये रावत यांनी नमूद केले, की भरती परीक्षांतील अनियमिततेप्रकरणी त्यांचे दीर्घ काळ सहकारी असलेल्या जिना यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर आपला विश्वास नाही. मात्र, या प्रकरणामुळे काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराला धक्का बसू नये अशी आपली इच्छा आहे.

“मी उत्तराखंड प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी समितीचा सदस्य असून, राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस कार्यकारिणीचा कायमस्वरूपी निमंत्रित सदस्य आहे. माझ्यामुळे पक्षाकडून सुरू असलेल्या लढ्याला कोणताही फटका बसू नये, यासाठी या दोन्ही पदांवरून अत्यंत नम्रपणे पायउतार होऊ इच्छितो,” असे रावत यांनी म्हटले. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी सज्ज होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाद्वारे शिक्षणव्यवस्थेला पोखरणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत असल्याचे रावत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com