हर्षल भोसले यश

हर्षल भोसले यश
Published on

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खरिपासाठी भुईमूग, सोयाबीनचे बियाणे मोफत देण्‍यात आले आहे. ते बियाणे खराब असल्‍याच्‍या तक्रारी असतील, तर शेतकऱ्यांनी त्‍याचे टॅग व्‍यवस्‍थित जपून ठेवावे. कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्‍या बियाणाची पाहणी करतील.
- प्रशांत शेंडे,
तालुका कृषी अधिकारी, कऱ्हाड.
.........................................

साताऱ्याचे हर्षल भोसले केंब्रिज विद्यापीठात

शारीरिक शस्‍त्रक्रियांवर मात करत घेतली झेप; एमफिलसाठी शिष्‍यवृती

सातारा, ता. २३ : येथील हत्तीखाना शाळेचे माजी विद्यार्थी आणि पर्यावरणतज्ज्ञ हर्षल सतीश भोसले यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळवून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. युनायटेड किंगडममधील या नामांकित विद्यापीठात ‘एमफिल इन कन्झर्व्हेशन लीडरशिप’ या अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे, केंब्रिज येथे शिक्षणासाठी त्यांना पूर्ण शिष्यवृत्ती प्राप्त झाली असून, ‘सेलविन कॉलेज’चे सदस्यत्वही मिळाले आहे, अशी माहिती कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली.
हर्षल यांचा प्रवास पश्चिम घाटाच्या निसर्गसंपन्न परिसरातून सुरू झाला. बालपणी सापांचे रेस्क्यू करण्यापासून सुरू झालेली त्यांची ही आवड पुढे व्यावसायिक पर्यावरण कार्यात बदलली. गेल्या १५ वर्षांत त्यांनी भारत आणि मध्यपूर्वेतील ओमान, सौदी अरेबिया, युएई या देशांमध्ये जैवविविधता मूल्यांकन, पायाभूत सुविधा प्रकल्पांचे पर्यावरणीय परिणाम आणि वन्यजीव अभ्यासावर कार्य केले आहे. त्यांनी २५ हून अधिक शोधनिबंध लिहिले असून, १५ पेक्षा जास्त नवीन प्रजातींच्या शोधात सहभाग नोंदवला आहे. बीबीसीच्या प्रसिद्ध माहितीपटासाठीही त्यांनी योगदान दिले आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या भूगोल विभागांतर्गत असणाऱ्या अभ्यासक्रमासाठी जगभरातून दर वर्षी केवळ २० अनुभवी संवर्धन व्यावसायिकांची निवड केली जाते. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या केंब्रिजमध्ये प्रवेश मिळवणारे हर्षल हे १९१६ नंतर सातारा जिल्ह्यातून जाणारे पहिले ठरल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. आर्थिक अडचणी आणि शारीरिक शस्त्रक्रियांच्या आव्हानांवर मात करत हर्षल यांनी हे यश मिळवले.

.....................................

हे केवळ माझे वैयक्तिक यश नसल्याचे सांगत एक मोठी जबाबदारी आहे. केंब्रिजमधील ज्ञानाचा वापर करून भारतात स्थानिक समुदायांवर आधारित संवर्धन व्यवस्था मजबूत करणे हे माझे ध्येय आहे.
- हर्षल भोसले
.....................................
PNE26W28548 हर्षल भोसले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com