esakal | हर्षवर्धन पाटलांना भाजपसाठी कौल
sakal

बोलून बातमी शोधा

harshvardhan patil

हर्षवर्धन पाटलांना भाजपसाठी कौल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इंदापूर - इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची दगाबाजी व काँग्रेस नेत्यांच्या हतबलतेमुळे व्यथित झालेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर आज (ता. ४) जुन्या इंदापूर बाजार समितीच्या पटांगणात विराट सभेस कौल मागितला आणि सभेने त्यांना भाजपमध्ये जाण्याचा कौल दिला. त्यांनीही हा कौल मान्य करून भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले. तसेच, येत्या मंगळवारी (ता. १०) निर्णय घेण्याची घोषणा केली.

इंदापूर काँग्रेसच्या वतीने येथील जुन्या इंदापूर बाजार समितीच्या पटांगणात जनसंकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब डोंबाळे पाटील होते. या वेळी सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोणते चिन्ह घेऊन व कोणत्या पक्षातून लढायचे, याचे अधिकार हर्षवर्धन पाटील यांना ठरावाद्वारे देण्यात आले. या वेळी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘मी पंचवीस वर्षांपासून राजकीय कार्यकर्ता असून, दिवंगत खासदार शंकरराव पाटील व आमदार राजेंद्रकुमार घोलप यांच्या स्वाभिमानी विचारसरणीने काम करीत आलो. लोकसभेस आपण पाच वेळा आघाडीचे काम केले. मात्र, विधानसभेस राष्ट्रवादी काँग्रेसने दगाबाजी केली.’’  

‘शेजारची माणसे लबाड’
‘‘विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी आपली चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेले काम त्यांनी नेहमी पूर्ण केले. त्यामुळे एकीकडे शब्द पाळणारी माणसे आहेत, तर दुसरीकडे शेजारची लबाड माणसे आहेत. देश व राज्यातील हवा तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांच्या विचाराशी सहमत असून, भाजपप्रवेशाचा निर्णय १० सप्टेंबर रोजी घेऊ,’’ असे हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले.

loading image
go to top