अतिवृष्टी बाधितांना मदतीबाबत सरकारची दुटप्पी भूमिका : हर्षवर्धन पाटील

प्रा. प्रशांत चवरे
Monday, 26 October 2020

अतिवृष्टी बाधितांना मदतीबाबत सरकारच्या करणी व कथनीमध्ये फरक असल्याची टिका राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

भिगवण : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत. सरकार एका बाजुला म्हणते की अतिवृष्टी बाधितांना सरसकट मदत करु तर दुसऱ्या बाजूला प्रशासन पंचनामे करताना दुजाभाव करत आहे. त्यामुळे अतिवृष्टी बाधितांना मदतीबाबत सरकारच्या करणी व कथनीमध्ये फरक असल्याची टिका राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येथे पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे यांच्या माध्यमातून पन्नास टक्के अनुदानावरील साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.  कार्यक्रमांसाठी बापूराव शेंडे, उपसभापती संजय देहाडे, भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजित क्षीरसागर, माजी सरपंच पराग जाधव, अशोक पाचांगणे, अशोक शिंदे, संपत बंडगर, य़शवंत वाघ,संजय रायसोनी, रणजित भोंगळे, जयदीप जाधव, प्राचार्य तुषार क्षीरसागर, ज्ञानेश्वर मारकड, तेजस देवकाते, राजेंद्र जमदाडे उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले, ''अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे यामध्ये दुजाभाव न करता सरसकट मदत करावी.'' कर्मयोगी साखर कारखान्याबाबत  पाटील म्हणाले, पुढील आठवडयात कर्मयोगीची एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. सध्या हंगाम सुरु झाला असून, शेतकऱ्यांनी कर्मयोगीस ऊस देऊन सहकार्य करावे. कार्यक्रमांमध्ये सुमाऱे शंभर पिठाच्या गिरणी व इतर साहित्याचे गरजूंना वाटप करण्यात आले. प्रास्ताविक उपसभपती संजय देहाडे यांनी व्यक्त केले. सुत्रसंचालन सचिन खडके यांनी केले तर आभार माजी सरपंच पराग जाधव यांनी मानले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भिगवणमध्ये सत्ताधाऱ्यांकडून केवळ सत्तेची संगीत खुर्ची
विकासाची स्वप्ने दाखवून येथील ग्रामपंचायतीमध्ये सत्तेत आलेले सत्ताधारी मागील पाच वर्ष विकासकामे करण्याचे विसरुन केवळ सत्तेच्या संगीत खुर्चीचा खेळ खेळण्यामध्ये व्यस्त होते. या कालावधीत केवळ सरपंच व उपसरपंच निवडीचाच विक्रम झाला. वैयक्तिक महत्वकांक्षी पुर्ण करण्यात व हेवेदाव्यात जनतेची पाच वर्षे वाया गेला. सत्तेच्या संगीत खुर्चीचा खेळ पुन्हा होऊ नये याची जनतेने काळजी घ्यावी.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harshvardhan Patil criticizes Mahavikas Aghadi government