Vidhan Sabha 2019 : तुळशीच्या लग्नासाठी ऊस मागण्याची शेतकऱ्यांवर वेळ : हर्षवर्धन पाटील

Harshvardhan Patil talked About Farmers issue in Maharashtra Vidhan sabha
Harshvardhan Patil talked About Farmers issue in Maharashtra Vidhan sabha

Vidhan Sabha 2019 : भिगवण : ''पाच वर्षापूर्वी इंदापुर तालुका ऊस उत्पादनांमध्ये राज्यात चौथ्या क्रमांकावर होता परंतु, सध्या हा दुष्काळी तालुका बनला असून निष्क्रीय लोकप्रतिनिधीमुळे तुळशीच्या लग्नाला लागणारा ऊसही इतरांकडे मागण्याची वेळ आली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी तर जलसंपदा मंत्र्यांनी पाण्यासाठी तालुका दत्तक घेतल्याची घोषणा केली आहे. तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न व शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भाजप-शिवसेना महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केले. 
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये भाजप-शिवसेना महायुतीच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते.

कार्यक्रमासाठी इंदौर येथील होळकर घराण्यातील भुषणसिंह होळकर, अप्पासाहेब जगदाळे, अमरसिंह घोलप, पृथ्वीराज जाचक, रमेश जाधव, मारुती वणवे, रामचंद्र निंबाळकर, कृष्णाजी यादव, नानासाहेब शेंडे, संपत बंडगर, संजय देहाडे, संदीपान कडवळे, अशोक वणवे, नितीन शिंदे, नितीन कदम, बाबासाहेब चवरे, माऊली चवरे, शेखर पाटील, पराग जाधव, तेजस देवकाते उपस्थित होते. 

हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे त्या उपस्थित राहू शकत नसल्याची माहीती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. इंदौरचे भुषणसिंह होळकर म्हणाले, ''छत्रपती शिवरायांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार करण्याचे काम पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या माध्यमातून साकार होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाच्या माध्यमातून अहिल्यादेवीच्या कामाचा आदर्श पुढे नेण्याचे काम सुरु आहे. मुद्रा योजना, गड किल्यांचे संवर्धन, चार लाख लोकांना घरे अशा कामांतून सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये क्रांती घडविली. आदीवासींच्या २२ योजना धनगर समाजाला लागू करुन धनगर समाजाला न्याय दिला आहे त्यामुळे, भाजप-शिवसना महायुतीला साथ दया. 

अमित गोरके, अशोक शिंदे, अप्पासाहेब जगदाळे, लालासाहेब रायसोनी, दिनेश मारणे, सचिन खडके, संजय रायसोनी, रामभाऊ पाटील, बाळासाहेब डोंबाळे, तुकाराम काळे, निलेश देवकर, यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मारुतराव वणवे यांनी केले तर आभार राजेंद्र जमदाडे यांनी मानले.

टक्केवारीसाठी रस्त्याची कामे निकृष्ट 

जगदाळे लोकप्रतिनिधींना पाच वर्षात पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही. जनावरांसाठी छावण्या नाहीत. तरुणांना रोजगार नाही अशी स्थिती आहे. तुम्हाला पाठींबा दिला की, आम्ही धर्मनिरपेक्ष व नाही दिला की जातीयवादी हे कसे. तालुक्यातील रस्त्याची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाली असुन टक्केवारीसाठीच ही कामे निकृष्ट दर्जाची केली असल्याचा आरोप अप्पासाहेब जगदाळे यांनी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com