हर्षवर्धन पाटलांच्या अडचणीमध्ये वाढ; राष्ट्रवादी जागा सोडणार नाही?

राजकुमार थोरात
शुक्रवार, 26 जुलै 2019

- इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही?
- हर्षवर्धन पाटलांच्या अडचणीमध्ये वाढ
- आमदार भरणे निवडूण येण्याचा राष्ट्रवादीला विश्‍वास

वालचंदनगर : इंदापूर विधानसभेची जागा राष्‍ट्रवादी कॉग्रेस पक्ष सोडणार नसल्याची चर्चा  जाेरदार सुरु असल्याने हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये पाटील भाजपच्या कमळावरती की अपक्ष निवडणूक लढवणार याकडे तालुक्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

२०१४ च्या विधानभा निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षाच्या आघाडीमध्ये बिघाडी झाली.दोन्ही पक्ष राज्यामध्ये स्वतंत्र लढले.याचा फटका इंदापूर तालुक्यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना बसला. या निवडणूकीूमध्ये राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या वीस वर्षाची मंत्रीपदीची सत्ता उलटवून निवडणूक जिंकली.

आज आमदार भरणे हे इंदापूर तालुक्याचे  विद्यमान आमदार आहेत. पाच वर्षाच्या कालावधीमध्ये भरणे यांनी  विरोधी पक्षाचे आमदार असताना देखील जिल्हात सर्वार्धिक निधी खेचून आणला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना इंदापूरच्या जागेवरती आमदार भरणे निश्‍चित विजयी होणार असल्याचा विश्‍वास आहे. गेल्या काही महिन्यपासुन हर्षवर्धन पाटील यांना कॉग्रेसमध्ये डावालले जात असल्याची चर्चा सुरु असल्याने तालुक्यातील कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याची मागणी ही लावून धरली होती.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही ३० एप्रिल २०१८ अंथुर्णेमध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये  वाटेल ते झाले तरी चालले,आघाडी तुटली तरी बेहतर... मात्र इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे ठासून सांगितले होते.

तसेच, सातारामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पवार यांनी राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षाच्या आघाडीमधील जागा वाटप निश्‍चित झाले नसल्याचे सांगितले आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील व चिरंजीव राजवर्धन पाटील यांच्यासह  भेट घेवून विधानगाथा पुस्तकांच्या प्रकाशनसोहळ्याचे निमंत्रण दिले आहे.मुख्यमंत्री यांच्या भेटीची चर्चा जोरादार सुरु असून हर्षवर्धन पाटील लवकरच भाजपचे कमळ हातात घेणार की अपक्ष लढणार याची चर्चा सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harshvardhan Patils difficulty Increase in indapur