

Maharashtra Sugar News Harshwardhan Patil Factory Penalised
Esakal
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्याच साखर कारखान्याला साखर आयुक्तांनी अकरा कोटींचा दंड ठोठावला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षांच्या कारखान्यानेच नियम डावल्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत. साखर आयुक्तालयाकडून परवाना मिळण्याआधीच ऊसगाळप सुरू केल्याचा ठपका ठेवत हा दंड ठोठावला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यावर कारवाईने खळबळ उडाली आहे.