esakal | Indapur : कर्मयोगी कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यात हर्षवर्धन पाटील यशस्वी
sakal

बोलून बातमी शोधा

Karmyogi Sugar Factory

कर्मयोगी कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यात हर्षवर्धन पाटील यशस्वी

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर - बिजवडी ( ता. इंदापूर ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखरकारखाना पंचवार्षिक निवडणूकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिनी २१ जागांसाठी २१ अर्ज राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

माजी सहकार मंत्री तथा कारखान्याचेअध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांना कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले. मात्र, या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक न लढवता कारखाना कारभार पारदर्शी नसल्याची टीका सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली होती. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याने कारखाना पारदर्शी व व्यावसायिक पद्धतीने चालविण्याची मोठी जबाबदारी श्री. पाटील यांच्यावर आहे. श्री. पाटील यांना कारखाना संस्थापक उपाध्यक्ष गोकुळदास शहा कुटुंबाची नाराजी दूर करण्यात यश आले. ही त्यांची जमेची बाजू झाली, तर पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांची मोठी मदत श्री. पाटील यांना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी झाली.

हेही वाचा: बेकायदा आरा गिरणीवर पुणे वनविभागाची कारवाई

या निवडणुकीत २१ जागांसाठी श्री. पाटील यांच्या पॅनेलचेच २१ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असली तरी निवडणूक कार्यक्रमानुसार याची अधिकृत घोषणा दि. २२ ऑक्टोबर रोजी होणार, असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत पाटील व तालुका सहाय्यक जिजाबा गावडे यांनी सांगितले. मात्र, निवडणूक बिनविरोध झाल्याने पाटील यांची कारखान्यावरील सत्ता अबाधीत राहिली असल्याने त्याचा फायदा त्यांना राजकीय पाठबळ वाढण्यास निश्चित होणार आहे. मात्र, त्यांनी कारखान्याचे अर्थकारण व्यवस्थित करून कारखाना राज्यातील पहिल्या दहा कारखान्यात आणण्यासाठी दिलेल्या आश्वासनानुसार सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. बिनविरोध गट व उमेदवार पुढील प्रमाणे :

इंदापूर गट - भरत शहा, शांतीलाल शिंदे ,रवींद्र सरडे.

कालठण गट - हर्षवर्धन पाटील, हनुमंत जाधव, छगन भोंगळे.

शेळगाव गट - बाळासाहेब पाटील,राहुल जाधव,अंबादास शिंगाडे.

भिगवण गट - पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड.

पळसदेव गट - भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर.

महिला राखीव - शारदा कुबेर पवार, कांचन अशोक कदम.

अनुसूचित जाती जमाती - केशव दुर्गे.

इतर मागास प्रवर्ग - सतीश व्यवहारे.

भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग - हिरा पारेकर.

ब वर्ग प्रतिनिधी - वसंत मोहोळकर.

loading image
go to top