esakal | बेकायदा आरा गिरणीवर पुणे वनविभागाची कारवाई | Pune
sakal

बोलून बातमी शोधा

pune

बेकायदा आरा गिरणीवर पुणे वनविभागाची कारवाई

sakal_logo
By
अक्षता पवार

पुणे : पिंपरी येथील रावेत परिसरात सुरू असलेल्या बेकायदा आरा गिरणीवर (सॉ मिल) पुणे वन विभागाने मंगळवारी कारवाई केली. रावेत मध्ये समर्थ पॅकेजिंगचे प्रीतम गौतमचंद कांकरिया हे बेकायदा आरा गिरणी चालवत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

या कारवाईत दोन कटर मशिन आणि एक आरा गिरणी यंत्र जप्त करण्यात आले असून वनविभागाकडून अवैध साठा आढळून आलेल्या गोदामाला देखील बंद करण्यात आले आहे. वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक मयूर बोठे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, सचिन रघतवान, वनपाल वैभव बाबर, महेश मेरगेवाड, वनरक्षक सुरेश बरले, बाळासाहेब जिवडे, ज्ञानेश्वर ठाकरे आदींनी ही कारवाई केली. तर याप्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे वन विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

loading image
go to top