
पुणे : ‘‘विकसित महाराष्ट्र २०४७चे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्यासाठी विविध १६ क्षेत्रनिहाय नागरिकांची मते, अपेक्षा, आकांक्षा आणि प्राधान्यक्रम जाणून घेण्यासाठी राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नागरिकांनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या क्यूआर कोडवर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे,’’ असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.