हवेलीत कोरोनाची लागण झालेल्या दोघांचा मृत्यू, 20 गावात कंटेनमेंट झोन

हवेलीत कोरोनाची लागण झालेल्या दोघांचा मृत्यू, 20 गावात कंटेनमेंट झोन

खडकवासला - हवेली तालुक्यातील कोरोनाची लागण झालेल्या दोघांचा मुत्यू झाला आहे. तर दिवसभरात 54 नवे रुग्ण आढळले आहेत.  परिणामी तालुक्यातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७०६ वर गेली आहे. गेल्या आठवड्याभरात हवेली तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांचे वाढते प्रमाण काळजी वाढवणारे आहे.  दरम्यान, खानापूर आरोग्य केंद्रातील परिचारीकेचा तपासणी अहवाल आज पाँझीटिव्ह आला. आतापर्यंत चार कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. खानापूर गावात कोरोनाची वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढविणारी आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यात आतापर्यंत कोरोनामुळे १३ जणांचे मुत्यू झाले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजनावर राबविल्या जात आहे. नांदेड येथे 75 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना मधुमेह व रक्तदाब होता. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तर दुसरा मृत व्यक्ती वडकी येथील आहे. 

लोणी काळभोर एक, कदम वाकवस्ती तीन, नांदेड पाच, नऱ्हे दोन, खडकवासला सात, केसनंद एक, कोलवडी एक, खानापूर दोन, गोऱ्हे खुर्द एक,  औताडे हांडेवाडी दोन, शेवाळवाडी पाच, उरुळी कांचन पाच, देहू तीन यासह दिवसभरात 54 जणांना लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने संशयित व बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्ती़च्या तपासणीवर भर दिला आहे.

हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन खरात म्हणाले,  तालुक्यात कोरोनामुळे आज दोघांचे मुत्यू झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जादा रुग्ण असलेल्या खानापूर ,खडकवासला, नऱ्हे, न्यू कोपरे, गुजरनिंबाळकरवाडी, किरकटवाडी, भिलारेवाडी, नांदेड, कोंढवे धावडेसह तालुक्यातील २० गावात कंन्टमेंट झोन तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७०६ वर झाली असून त्यातील ३२९ जण बरे होऊन घरी आले आहेत. तर ३७४ जणांवर उपचार सुरू आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com