
Maharashtra Medical Council
Sakal
पुणे : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेतील (एमएमसी) नोंदणीला अंतरिम स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी ही अंतिम आदेशाच्या अधीन असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेतील नोंदणी (एमएमसी) सुरूच राहणार असल्याचे होमिओपॅथी डॉक्टरांच्या संघटनेने बुधवारी स्पष्ट केले.