आषाढीनिमित्त शहरातील 51 विठ्ठल मंदिरांच्या प्रमुखांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

आषाढ़ी एकादशीच्या निमित्ताने 'आम्ही पुणेकर' व 'श्री लिम्बराज महाराज ट्रस्ट' यांच्या वतीने पुणे शहरातील 51 विठ्ठल मंदिरांच्या प्रमुखांचा सत्कार आणि हरित वारी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

पुणे - आषाढ़ी एकादशीच्या निमित्ताने 'आम्ही पुणेकर' व 'श्री लिम्बराज महाराज ट्रस्ट' यांच्या वतीने पुणे शहरातील 51 विठ्ठल मंदिरांच्या प्रमुखांचा सत्कार आणि हरित वारी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तर या हरित वारीचे शुभारंभ बाजीराव रस्त्यावरील श्री लिम्बराज महाराज विठ्ठल मंदिरात करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

यावेळी कार्यक्रमाला स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पं. वसंतराव गाडगीळ, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, आम्ही पुणेकरचे हेमंत जाधव, ट्रस्टचे अखिल झांझले, निर्मल वारीचे प्रणव पवार, भारतीय वारकरी मंडलचे अध्यक्ष संदीप वळसे उपस्थित होते. पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे हे आॅनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी तुळशीच्या रोपाला पाणी घालून हरितवारी उपक्रमाची सुरवात करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील 51 विठ्ठल मंदिरांच्या प्रमुखांना धान्याचे किट, भगवत गीता प्रत, तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी लिम्बराज महाराज मंदिरांच्या शोभेच्या कमानीचे उद्घाटन स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक राजेश येनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heads of Vitthal temples in the city felicitated on the occasion of Ashadi