esakal | बारामतीत प्रशासनाने कमालच केली राव; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत प्रशासनाने कमालच केली राव; वाचा सविस्तर

कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन आता अँक्टिव्ह आणि अँग्रेसिव्ह मोडमध्ये आहे. लोकांनी तपासणीसाठी दवाखान्यापर्यंत येण्याऐवजी आता प्रशासनानेच लोकांच्या घरापर्यंत जाऊन तपासणीची मोहिम हाती घेतल्याने लोकांनाही दिलासा मिळाला आहे.

बारामतीत प्रशासनाने कमालच केली राव; वाचा सविस्तर

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : ….कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन आता अँक्टिव्ह आणि अँग्रेसिव्ह मोडमध्ये आहे. लोकांनी तपासणीसाठी दवाखान्यापर्यंत येण्याऐवजी आता प्रशासनानेच लोकांच्या घरापर्यंत जाऊन तपासणीची मोहिम हाती घेतल्याने लोकांनाही दिलासा मिळाला आहे.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

एकाच दिवशी तीन गावातील 32200 लोकांची तपासणी झाली यात प्रशासनाने तब्बल 51 कोरोनाबाधित शोधून काढले. या पैकी 40 जण लक्षणे नसलेले आहेत तर उर्वरित 11 जणांना लक्षणे असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.  

आज बारामती तालुक्यातील माळेगाव, पणदरे व गुनवडी या तीन गावात प्रशासनाने एकाच दिवशी सर्व कुटुंबातील सर्व व्यक्तींची वेगवान तपासणी केली. दस्तुरखुद्द जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या तिन्ही गावातील घराघरात जाऊन स्वताः हे सर्वेक्षण व्यवस्थित होते की नाही याकडे लक्ष दिले. इतक्या वरिष्ठ अधिका-यानेच या सर्वेक्षणात सहभाग घेतल्याने यंत्रणेनेही आज गतीने काम केले.
  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

घरातील व्यक्तींची चौकशी करत त्यांची तपासणी झाली का, काय प्रश्न विचारले गेले, तापमान घेतले गेले का यासह अनेक बाबींची त्यांनी रस्त्यावर उतरुन चौकशी केली. आज स्वताः आयुष प्रसाद हेही सर्वेक्षण करणा-या कर्मचा-यांइतकेच फिरत होते. तिन्ही गावात त्यांनी बारकाईने प्रत्येक गोष्टीची माहिती घेतली, गरज पडेल तेथे सूचना केल्या व सर्वांना प्रोत्साहनही दिले.

एकाच दिवशी सर्वच ग्रामस्थांची तपासणी झाल्याने लोकांच्या मनातील भीतीही दूर झाली आणि ज्यांना काहीही झाले नाही अस वाटत होते, त्यातील काही जण पॉझिटीव्ह आढळले. अनेकांना आपला रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे कळल्यानंतर आश्चर्याचा धक्काच बसला. मात्र लक्षणे नसलेल्यांच्या वर्गवारीत ते असल्याचे नंतर सांगितले गेले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असे झाले सर्वेक्षण
माळेगावमध्ये 92, पणदरे येथे 25 तर गुनवडीत 43 पथकांनी सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत सर्वेक्षण केले. एका पथकाने किमान 50 कुटुंबाचे सर्वेक्षण केले. दोन शासकीय कर्मचारी व एक स्वयंसेवक असे तिघांचे हे पथक होते. दुपारी एक नंतर संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले व संध्याकाळी या 51 जणांना कोविड केअर सेंटरकडे रवाना करण्यात आले. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)