
Swasth Nari Sashakt Parivar
Sakal
पुणे : आरोग्य विभागाने गेल्या पंधरा दिवसांत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाअंतर्गत राज्यातील तब्बल एक कोटी आठ लाख महिला व पुरुषांच्या आरोग्य तपासण्या केल्याचा दावा केला आहे. या आकडेवारीचा आरोग्य विभागाकडून गवगवा केला जात असला तरी, प्रत्यक्षात किती रुग्णांना कोणत्या आजारांचे निदान झाले, त्यांना उपचारासाठी कोठे पाठवले, याची आकडेवारी गुलदस्तात ठेवली आहे. त्यामुळे, खरच उपचार झाले आहेत का हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. यावरून आरोग्य विभागाचा तपासण्यांचा धडाका; परंतु, निदान व उपचाराचे काय? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.