
Pune Water Crisis
Sakal
कर्वेनगर : बावधन बुद्रुक परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना अशुद्ध आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने योग्य त्या उपायांची अंमलबजावणी करावी, अशी येथील स्थानिक रहिवाशांची मागणी आहे.