minister prakash abitkar
sakal
पुणे - अमरावती येथील जिल्हा स्त्री शासकीय रुग्णालयात आग लागून नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली आहे. राज्यातील सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट, विद्युत सुरक्षा, इमारतींचे बांधकाम तसेच संबंधित यंत्रणांचे ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.