
लोणी काळभोर : पुर्व हवेलीमधील उरुळी कांचन, थेऊर, कदमवाकवस्ती व कुंजीरवाडी या प्रमुख चार ग्रामपंचायत हद्दीत करोनाचे वाढते रुग्न ही बाब चिंताजणक आहे. आरोग्य खात्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाबाधित आणि त्यांच्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांचा शोध घेण्याची मोहिम अधिक प्रभावीपणे राबवावी. यापुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव पुर्णपणे रोखण्यासाठी आऱोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने सक्तीची भुमिका घ्यावी. त्याचवेळी आऱोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वरील प्रयत्नांना, नागरीकांनाही साथ द्यावी असे आवाहन आमदार अशोक पवार यानी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे केले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
लोणी काळभोर येथील कोविड केअर सेंटरचे काम अतिशय चांगले चालले असुन, या सेंटरमध्ये जास्तीत जास्त स्वॅबच्या तपासण्या व्हाव्यात यासाठी डॉक्टर व परिचारिका, इतर वैद्यकीय कर्मचारी हे मनुष्यबळ त्वरीत उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार या नात्याने प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. पुर्व हवेलीत मागील वर्षी ऑक्टोबर महिण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचे नुकसान झालेल्या तीनशे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे ५२ लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश शनिवारी (ता. २७) सायंकाळी कदमवाकवस्ती येथील मधुबन कार्यालयात आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आमदार पवार यांनी आरोग्य विभाग व महसुल खात्याकडुन पुर्व हवेलीमधील कोरोनाचे संकट व त्यावरील उपाय योजनाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांच्या समवेत बोलतांना पवार यांनी वरील माहिती दिली.
--------------
प्रत्येक रविवारी होणार लॉकडाऊन; राज्य सरकारचा मोठा निर्णय
--------------
कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीवर; तर मृत्यूंची संख्या...
--------------
यावेळी यशवंत सहकारी साखऱ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, हवेली पंचायत समितीचे उपसभापती सनी काळभोर, राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष सुर्यकांत गवळी, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य विलास काळभोर, हवेलीचे तहसिलदार सुनिल कोळी, हवेलीचे कृषी अधिकारी एस. जी. नर्हे, लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, राष्ट्रवादी कॉ़ग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार काळभोर, तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, लोणी काळभोरचे उपसरपंच राजाराम काळभोर, कदमवाकवस्तीचे उपसरपंच बाबासाहेब काळभोर, ऋुषी काळभोर, पांडा काळभोर, रमेश मेमाने आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आमदार अशोक पवार म्हणाले, पुर्व हवेलीमधील केवळ पाच ते सहा गावात मिळुन मागिल सहा दिवसात साठहुन अधिक कोरोनाचे रुग्न आढळुन आले आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे. पोलिस खाते, महसुल, आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भआव रोखण्यासाठी चोविस तास प्रयत्न करत असतामना, नागरीक पुरेशी काळजी घेत नसल्याने कोघेत नसतील तर त्याबाबत सक्तीची भुमिका घ्यावी. आमदार या नात्याने प्रशासनाच्या प्रयत्नांना पुर्णपणे साथ देऊ.
विश्वराजमध्ये लवकरच वाढीव १०० खाटा...
आमदार अशोक पवार पुढे म्हणाले, कोरोना बाधीत रुग्णावर स्थानिक परीसरात उपचार व्हावेत यासाठी विश्वराज हॉस्पीटलमध्ये सध्या वीस खाटा राखीव आहेत. मात्र कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता, वरील विस खाटा पुरत नसल्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे. यामुळे पुर्व हवेलीमधील कोरोना बाधीत रुग्नांना पुण्याऐवजी, लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पीटल या खाजगी रुग्नालयात उपचार मिळावेत यासाठी, विश्वराज हॉस्पीटलमधील आनखी शंभर खाटा उपलब्द करुन देण्याबाबत अधिकाऱ्यांना सुचना करण्यात आल्याचेही आमदार अशोक पवार यांनी यावेळी स्पष्ठ केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.