अरे देवा! पुणे महापालिकेचा आरोग्य विभागच पडला आजारी

Coronavirus
Coronavirus

पुणे - कोरोना विषाणूंचा उद्रेक झालेल्या पुण्याचे आरोग्य गेल्या चार महिन्यांपासून सांभाळणाऱ्या पुणे महापालिकेचा आरोग्य विभागच आता आजारी पडला आहे. महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांसह, पाचपैकी तीन सहायक आरोग्यप्रमुख आजारी आहेत. त्यापैकी दोन जणांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील कोरोनाचा विषाणूंचा पहिला रुग्ण पुण्यात ९ मार्चला आढळला. त्यानंतर वेगाने फैलाव होणारा या विषाणूंना नियंत्रित करण्यात महापालिकेचा आरोग्य विभाग आघाडीवर होता. मात्र, आरोग्य खात्यातील एक-एक कर्मचाऱ्याना कोरोना झाल्याचे या आठवड्यापासून निदान होऊ लागले. सहायक आरोग्य प्रमुखांच्या कक्षातील कर्मचाऱ्याचाही यात समावेश आहे. 

महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्यासह सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे, डॉ. वैशाली जाधव, डॉ. संजीव वावरे आणि डॉ. मनीषा नाईक यांच्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाची धुरा आहे. मात्र, या सहापैकी फक्त एकच सहायक आरोग्यप्रमुख बुधवारी महापालिकेत होत्या. एक सहायक आरोग्यप्रमुख रजेवर होते. तर, इतर अधिकाऱ्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यापैकी दोन सहायक आरोग्य प्रमुखांना कोरोना झाल्याचे निदान प्रयोगशाळा तपासणीतून झाले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com