esakal | पर्यावरण व आरोग्यासाठी शिक्षकांनी सायकलचा वापर करणे गरजेचे
sakal

बोलून बातमी शोधा

CYCLE

पर्यावरण व आरोग्यासाठी शिक्षकांनी सायकलचा वापर करणे गरजेचे

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महा विद्यालयाच्या आय कॉलेज सायकल क्लबचे ४० सदस्य रोज सायकलचा वापर करणार आहेत. पर्यावरण संतुलन, मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती साठी हा उपक्रम स्तुत्य आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले.

इंदापूर महाविद्यालयात श्री. पाटील यांच्या हस्ते आय कॉलेज सायकल क्लबचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेचे खजिनदार ॲड. मनोहर चौधरी, सहसचिव प्रा. बाळा साहेब खटके, संचालक तुकाराम जाधव, पराग जाधव, प्राचार्य डॉ. संजय चाकणे उपस्थित होते.

हेही वाचा: प्रथमच मिळालेल्या स्पोर्ट गणवेशाने हरखुन गेली आदिवासी बालके

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, पर्यावरणीय रक्षण आणि संभाव्य कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी तसेच आपल्याउत्तमआरोग्यासाठी सायकल चालवणे हा महत्वाचा पर्याय आहे. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या दैनंदिन कामकाजासाठी येताजातानासायकलचा वापर केला पाहिजे. नव्या पिढीला व्यायाम व सायकलचे महत्व या उपक्रमातून होईल. बारामती, भिगवण, बावडा, इंदापूर या ठिकाणी सायकल क्लब स्थापन झाले असून चारशे ते पाचशे व्यक्ती या माध्यमातून रोज सायकलिंग करत आहेत.

इंदापूरमहाविद्यालयाचे दोन विद्यार्थी रामेश्वर या ठिकाणी सायकलवर गेले असून ते २३०० किलोमीटर सायकल प्रवास करणार आहेत. आय कॉलेजसायकल क्लबच्या माध्यमातून महाविद्यालयातीलशिक्षक सायकलिंग करणार आहेत, त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. प्रास्ताविक व सुत्रसंचलन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले.

loading image
go to top