
पुणे : ‘‘आजकाल समाजमाध्यमांमुळे कोणतीही चुकीची गोष्ट लपून राहत नाही. एखाद्या रुग्णालयात काही चुकीची घटना घडल्यास ती वेगाने नागरिकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे रुग्णालयांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. रुग्णालयांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवावी व गरजू रुग्णांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्याव्यात’’, अशा सूचना राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी धर्मादाय रुग्णालयांच्या प्रतिनिधींना केल्या.