इंटरनेटच्या व्यसनामुळे समस्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

पुणे - ‘आजचे तरुण सोशल मीडियाच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यांना इंटरनेटच्या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी पालकांची मार्गदर्शन व भूमिका महत्त्वाची आहे,’’ असे सूर तेजज्ञान फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘इंटरनेट अभिशाप की वरदान’ या विषयावरील परिसंवादात उमटला. आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, मनोविकारतज्ज्ञ डॉ. आमोद बोरकर, मानसोपचारतज्ज्ञ कल्याणी घोडके, पत्रकार नीता बरेलीकर, फाउंडेशनच्या विश्‍वस्त डॉ. तेजविद्या आदी परिसंवादात सहभागी झाले होते. 

‘‘माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीमुळे जीवन सुसह्य झाले आहे. परंतु तंत्रज्ञानाचा योग्य वापर झाला नाही, तर त्याचा विपरीत परिणाम होतो. इंटरनेटच्या बाबतीत असेच झाले आहे. सोशल मीडियावरील प्रमाणाबाहेर वापर चिंता निर्माण करणारा आहे. त्यामुळे रोजच्या कामात अडथळे निर्माण होऊन जीवनाची घडी बिघडू शकते,’’ असे डॉ. तेजविद्या यांनी सांगितले. मुले पालकांचे अनुकरण करीत असतात. त्यामुळे इंटरनेटचा अतिवापर टाळण्यासाठी पालकांचे समुपदेशनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे डॉ. दुधाणे यांनी नमूद केले. प्रसाद सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Problem by Internet Social Media Addiction