
आरोग्य भरती परीक्षांबाबत टोपेंचे महत्त्वाचे विधान; म्हणाले...
पुणे : आरोग्य भरतीची परीक्षा पुन्हा होणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली असून, त्याच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी (Ajit Pawar) चर्चा झाल्याचेही टोपेंनी सांगितलं. ते पिंपरी-चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलत होते. (Rajesh Tope On Health Requirement Exam )
हेही वाचा: सहनशीलतेचा अंत पाहू नका; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
आरोग्य भरती संदर्भात विधानसभेत पोलिसांना सखोल चौकशी करण्यासादर्भत आदेश दिले होते. पोलिसांचा डिटेल अंतिम रिपोर्ट अत्यावश्यक आहे. ड वर्गाचा पेपर पूर्ण व्हायरल झाला होता. त्यामुळे आम्ही पुन्हा 'ड' वर्गाची परीक्षा घेणार आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केली असून, याबाबत त्यांचंही मत लक्षात घेतलं आहे. दोन्ही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय आहे. त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचादेखील निर्णय यामध्ये झाला असल्याचे टोपे म्हणाले.
हेही वाचा: राजद्रोहाचे खटले स्थगित होणार? सुप्रीम कोर्टानं केंद्राला दिले 'हे' निर्देश
कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत काय म्हणाले टोपे
यावेळी राजेश टोपे यांनी कोरानाच्या (Corona) चौथ्या लाटेबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, कुठेही कोरोनाची चौथी लाट असल्याचा माझा सूतोवाच नाही. सध्या कमी प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. महराष्ट्राने यापूर्वी मोठी रुग्णसंख्या पहिली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Rajesh Tope On Covid Wave)
राणांचा फोटोवरही वक्तव्य
सिटी स्कॅन, MRI याठिकाणी जाऊन फोटो काढणं ही पद्धत मी आरोग्यमंत्री असताना कुठेही पाहिली नाही. या पद्धतीचे फोटो सेशन रुग्णालयाला अंधारात ठेवून कुणी दुसऱ्याने केलं असेल हे पण चुकीचे आहे, असेही टोपे म्हणाले.
Web Title: Health Recruitment Exam Will Be Held Again Says Rajesh Tope In Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..