
पुणे : सरकारी दवाखाने, रुग्णालये, आरोग्य कार्यालयांत वारंवार गैरहजर राहणारे कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर यांचा एप्रिल महिन्याचा पगार कापण्यात आला. आरोग्य विभागाची ही मात्रा लागू पडली आहे. दांडीबहाद्दरांना जाग आली असून, कार्यालयांतील उपस्थिती वाढली आहे.