
Pune Health News
Sakal
पुणे : ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाद्वारे गेल्या १३ दिवसांत ५ लाख ७० हजार महिलांची मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, गर्भवती, ॲनिमिया अशा विविध तपासण्यांचा समावेश आहे. या अभियानात ५५ हजार जणांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले.