Pune : विकास आराखड्यावरील हरकती व सूचनांबाबत तातडीने सुनावणी घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : विकास आराखड्यावरील हरकती व सूचनांबाबत तातडीने सुनावणी घ्या

पुणे : विकास आराखड्यावरील हरकती व सूचनांबाबत तातडीने सुनावणी घ्या

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने जाहीर केलेल्या प्रारुप विकास आराखड्याबाबत अनेक नागरिकांनी हरकती घेतलेल्या आहेत. अनेक ठिकाणी चूकीच्या पद्धतीने आरक्षणे टाकल्याने स्थानिकांमध्ये विकास आराखड्याबाबत नाराजी असल्याने नागरिकांच्या हरकतीबाबत तातडीने सुनावणी घेण्याच्या मागणीचे निवेदन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे यांना मनसेच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघ पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.

2 ऑगस्ट रोजी पीएमआरडीएने प्रारुप विकास आराखडा जाहीर केला. त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या. अनेक नागरिकांनी विकास आराखड्याबाबत आक्षेप नोंदवला आहे परंतु त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही पीएमआरडीए प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.त्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांनी आयुक्त सुहास दिवसे यांची भेट घेऊन चर्चा केली व सुनावणी घेण्याची मागणी केली.

हेही वाचा: ‘सिंबायोसिस’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साहित्य महोत्सवाची मेजवानी

पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे यांनी, 'येत्या दहा दिवसांत तीन अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात येणार असून त्या समितीच्या माध्यमातून विकास आराखड्याबाबत आलेल्या हरकतींची सूनावणी घेण्यात येणार असल्याचे' उपस्थितांना सांगितले. यावेळी मनसेचे खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष विजय मते, पुणे जिल्हा विधी विभाग अध्यक्ष ॲड. अरविंद मते, शाखाध्यक्ष प्रसाद मते, परेश वैद्य,अमर आडळगे, प्रविण सोनवणे उपस्थित होते.

loading image
go to top