‘सिंबायोसिस’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साहित्य महोत्सवाची मेजवानी | Symbiosis College | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सिंबायोसिस’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साहित्य महोत्सवाची मेजवानी

‘सिंबायोसिस’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साहित्य महोत्सवाची मेजवानी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - सिंबायोसिसच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतर्फे ‘साहित्य महोत्सव २०२१’ चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी, कर्मचारी आणि समाजातील सर्वच घटकांना प्रेरित करणे हा साहित्य महोत्सवाच्या आयोजनामागील मुख्य हेतू आहे. यूट्यूबवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

साहित्य महोत्सवाचा उद्घाटन सोहळा शनिवारी (ता.२०) सकाळी १०.३० वाजता होईल. जावेद अख्तर, कवी, गीतकार आणि पटकथाकार यांना कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार हे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असतील. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र- कुलपती डॉ. विद्या येरवडेकर आणि कुलगुरू डॉ.राजनी गुप्ते या वेळी उपस्थित राहतील. यानंतर सकाळी ११ वाजता ‘तियानमेन ते गलवान पर्यंत चीनचे डीकोडिंग’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात माजी राजदूत विजय गोखले, माजी राजदूत गौतम बंबावाले आणि गणेश नटराजन सहभागी होतील.

दुपारी १२.१५ वाजता डॉ. मनीषा पाठक शेलाट यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या वाचन होणार आहे. दुपारी १.४५ वाजता ‘कोरोनाच्या काळातील अन्न’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. त्यात शेफ संजीव कपूर, डॉ. कुरुश दलाल, सई कोरान्ने- खांडेकर, डॉ. हॉवर्ड रोझिंग सहभागी होणार आहेत. राहुल रवैल लिखित राज कपूर यांच्यावरील पुस्तकाचे वाचन, स्वाती जेना आणि टी. एन. हरी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे वाचन आणि शेवटच्या सत्रात बालसाहित्य या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये गीता धर्मराजन, तारा बुक्स (रागिणी सिरुगुरी) आणि वर्षा शेषन सहभागी होतील.

हेही वाचा: अम्रीता विश्व विद्यापीठ, सकाळ, यीन प्रस्तुत विल रोबोट रुल Manufacturing इंडस्ट्री विषयवार वेबीनार

दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.२१) माजी राजदूत पवन के. वर्मा आणि डॉ. राकेश कुमार यांनी लिहिलेल्या पुस्तकावर चर्चा तसेच ध्रुव सहगल यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सिंबायोसिस साहित्य महोत्सवाच्या नोंदणीसाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

https://zoom.us/meeting/register/tJEsfuqtrDwpGd0TkI2HzNuhTTVtjucOxy53

YouTube Live Streaming URL:

Nov 20th,2021 (Day 1)

https://youtu.be/xVCjOpqLok8

Nov 21st, 2021 (Day 2)

https://youtu.be/XrtRYKKVjPE

loading image
go to top