NCP Pune : राष्ट्रवादीने दाखल केलेल्या पुणे प्रभाग रचनेच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Pune

NCP Pune : राष्ट्रवादीने दाखल केलेल्या पुणे प्रभाग रचनेच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

पुण्याच्या प्रभाग रचनेची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. नवीन प्रभाग रचनेवर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत सुप्रीम कोर्टात याचीका दाखल केली होती. राज्यात सत्तांतर झाल्यावर पुणे शहराची प्रभाग रचना बदलून चार सदस्यांचा प्रभाग नवीन सरकारने केला होता.

दरम्यान हीच प्रभाग रचना चुकीची असल्याचा दावा करत राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायालयीन व्यवस्थेवर आमचा पुर्ण विश्र्वास आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. तर आज कोर्टाचा निर्णय येईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका जाहीर होतील. सध्याचं सरकारं निवडणुक घेण्यास उत्सुक नाही तर आज अंतिम तारीख निकाल येणे अपेक्षित असल्याचंही राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हटलं आहे.

हे ही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

तर 92 नगरपरिषदांमध्ये सुद्धा ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का? महानगरपालिका मधल्या प्रभाग पद्धतीच्या बदलांना मान्यता मिळणार का? या बाबतच्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका नेमक्या कधी होणार याचे भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics : राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण वाढले; ठाकरे गटाला भलताच संशय

टॅग्स :Pune NewsSupreme Court