
Pune Municipal Corporation Election
पुणे - पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर पावणे सहा हजार हरकती, सूचना आल्या आहेत. त्यावर गुरुवारी (ता.११) आणि शुक्रवारी (ता.१२) बालगंधर्व रंगमंदिर येथे सुनावणी घेण्यात येणार आहे. ही सुनावणी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर सचिव व्ही. राधा यांच्या समोर होणार आहे.