esakal | पुणे : पाच दिवसांच्या ‘बाप्पा’ला भावपूर्ण निरोप
sakal

बोलून बातमी शोधा

bappa

पुणे : पाच दिवसांच्या ‘बाप्पा’ला भावपूर्ण निरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती गेले गावाला, चैन पडे ना आम्हाला’ असे म्हणत घरोघरी विराजमान झालेल्या पाच दिवसांच्या ‘बाप्पा’ला भावपूर्ण वातावरणात आणि जड अंत:करणाने मंगळवारी निरोप देण्यात आला. गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी सायंकाळी भक्तांनी विसर्जन हौदावर हजेरी लावली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश भाविकांनी घरच्या घरी ‘बाप्पा’ची मूर्ती विसर्जन करण्याला प्राधान्य दिले. त्यासाठी घरोघरी, सोसायट्यांमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सायंकाळी विधिवत पूजा आणि आरती करत बाप्पाला निरोप देण्यात आला. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे संकट दारोदारी असतानाही भक्तांनी मोठ्या उत्साहात घरगुती गणेशोत्सव साजरा केला.

पाच दिवसांच्या ‘बाप्पा’समवेत दोन दिवसांपूर्वी घरोघरी आलेल्या गौराईंना निरोप देण्यात आला. दरवर्षी मोठ्या वाजत-गाजत घरातील मंडळी छोटेखानी मिरवणूक काढत पाच दिवसांच्या ‘बाप्पा’ला निरोप देतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणाने आणि भक्तिमय वातावरणात ‘श्रीं’च्या मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. दुपारनंतर विसर्जन हौदावर गर्दी झाली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, सुरक्षा व्यवस्थाही चोख करण्यात आली होती.

loading image
go to top