Pune News: अर्थसंकल्पावरून सत्ताधारी-विरोधकांत जुंपली; पुणे महापालिका सभा, रात्री उशिरापर्यंतच्या चर्चेनंतर अर्थसंकल्पास मान्यता!

Pune municipal budget highlights and controversy: पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर सत्ताधारी-विरोधकांत तीव्र वादविवाद
High Drama in Pune Municipal Meeting; Budget Gets Nod After Prolonged Discussion

High Drama in Pune Municipal Meeting; Budget Gets Nod After Prolonged Discussion

sakal

Updated on

पुणे : महापालिकेत मांडलेला १५ हजार ६६९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाद्वारे शहराच्या विकासाला गती मिळणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वांगीण विकास करणारा आहे, असा दावा भाजपने अर्थसंकल्पावरील चर्चेत केला. तर, अर्थसंकल्प भाजप व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये भेदभाव करणारा आहे. समाविष्ट गावांच्या विकासावर परिणाम करणारा असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली अर्थसंकल्पावरील सभा बारा तासांहून अधिक वेळ चालली. त्यात रात्री उशिरा अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com