

Citizens struggle under scorching heat in Pune as temperatures cross 40°C, leading to rising hospital cases.
sakal
पुणे : शहरात तीव्र उन्हाळा जाणवत असून, एप्रिलमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याने उष्णतेशी संबंधित थकवा, निर्जलीकरण, ताप, चक्कर येणे अशा त्रासांच्या झळाही पुणेकरांना बसत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या महिनाभरात महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांमध्ये ७००हून अधिक नागरिकांवर उपचार करण्यात आले असून, उष्माघाताच्या एका रुग्णाची नोंद झाली आहे.