

Rising Urban Heat Pushes Pune Temperature to 41.8°C, Highest in Years
sakal
पुणे : पुण्यात गेल्या आठवडाभरापासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून, रविवारी (ता. २६) शहराचे कमाल तापमान ४१.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. २०१९ नंतर पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात पुण्याचे तापमान इतक्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. वाढते शहरीकरण आणि देशभरातील हवामान प्रणालींमध्ये झालेले बदल यामुळे पुण्याच्या तापमानात ही मोठी वाढ नोंदवली गेली असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.