Pune Rain: वीज कडकडाटासह मुसळधार पाऊस; पुणे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत, एकाचा मृत्यू, मंचरमध्ये तासात ३६ मिलिमीटर पावसाची नोंद

Severe thunderstorm causes disruption in Pune district villages: पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, राजगड, मुळशी तालुक्यांत मुसळधार पावसाचा कहर; हातातोंडाशी आलेली पिके, फळबागा उद्ध्वस्त होऊन शेतकरी आर्थिक संकटात
Thunderstorms Paralyse Pune District; Crops, Roads and Power Supply Affected

Thunderstorms Paralyse Pune District; Crops, Roads and Power Supply Affected

sakal

Updated on

पुणे : जिल्ह्याला शुक्रवारी (ता. २२) दुपारनंतर विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यांना निसर्गाने सर्वाधिक तडाखा दिला. अवघ्या काही तासांत हातातोंडाशी आलेली पिके, फळबागा उद्ध्वस्त झाल्याने बळिराजा आर्थिक संकटात सापडला आहे. तर खरीप हंगामाच्या तयारीला खीळ बसली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com