Khadaki rain water in home
sakal
खडकी - दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याबाबत तेच ते प्रश्न उपस्थित होऊनही प्रशासनाला ठोस उपाययोजना करता आलेल्या नाहीत. याचाच प्रत्यय आज खडकी भागात आला असून मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते आणि सखल भाग जलमय झाले आहेत. येथील प्रसिद्ध गुरुद्वारा भागात रस्त्यावर गुडघाभर पाणी जमा झाल्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.