पुणे : भल्या सोमवारी सकाळपासूनच शहरात पावसाने धुवाधार बॅटिंग सुरू केली. अचानक सुरू झालेल्या पावसाचा जोर दुपारी हळू हळू वाढत गेला. दुपारी एकनंतर पाऊस प्रचंड वाढला व तो तीन ते चार वाजेपर्यंत सुरू होता..दुपारी चारनंतर प्रमाण कमी झाले. अचानक आलेल्या पावसामुळे सकाळपासूनच शहर व उपनगरांमध्ये रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नोकरीनिमित्त घराबाहेर पडलेल्यांची पाऊस व वाहतूक कोंडीने चांगलीच तारांबळ उडाली. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पुण्याच्या वेगवेगळ्या भागांत, ग्रामीण परिसरामध्ये ३ ते २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली..भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील आठवडाभर पुणे व परिसरात आकाश ढगाळ राहून पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा दोन दिवसांपूर्वीच दिला होता; तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, या भागाला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यानुसार शहर व परिसरात सोमवारी सकाळीच पावसाला सुरुवात झाली. .सुरुवातीला अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. नंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळायला लागल्या. त्यामुळे, सिंहगड रस्ता, शास्त्री रस्ता, नगर रस्ता, पेठांच्या मध्यवर्ती भागांतील रस्ते, उपरस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. खासकरून शिवाजीनगर, स्वारगेट, कोथरूड, कात्रज, कर्वेनगर या भागांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली..कार्यालयीन वेळेत पाऊस वाढल्याने चाकरमान्यांची मोठी धावपळ झाली. बस, रिक्षा तसेच खासगी वाहनांच्या रांगा लागल्या. पावसामुळे शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागला. .मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूलबसनादेखील या वाहतूक कोंडीचा फटका बसल्याने त्यांनाही नियोजित वेळेपेक्षा उशीर झाला. तर, अनेक मुलांना घराबाहेर पडता न आल्याने शाळेला गैरहजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांचा वेग कासवगतीनेच सुरू होता. अनेक जण भिजतच शाळा व कार्यालयांमध्ये पोहोचले. काही ठिकाणी घरांच्या अंगणात, तर रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले..नागरिकांना सतर्कतेचे आवाहन‘‘हवामान विभागाने दिलेला अलर्ट लक्षात घेऊन महापालिकेकडून सर्व तयारी पूर्ण केली आहे. मात्र घाटमाथ्यावर पाऊस वाढून धरणातून विसर्ग सुरू झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहावे,’’ असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सोनुने यांनी केले..Akola Accident: कावड यात्रेदरम्यान अकोल्यात ट्रॅक्टरला अपघात, १५ भाविक जखमी.हवामान खात्याचा अंदाजहवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस घाट विभागात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता१९ व २० ऑगस्टला शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेलया काळात कमाल तापमान २५ ते २९ अंश सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान २१ ते २३ अंशांदरम्यान राहील२१ ऑगस्टपासून पावसाचा जोर काहीसा कमी होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित२२ व २३ ऑगस्ट रोजी पावसाचा जोर कमी होऊन वातावरण ढगाळ राहील. या दोन दिवसांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यताहवामान खात्याने विशेषतः घाट विभागात प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.