खडकवासला धरण साखळीत जोरदार पावसाची हजेरी; धरणांत 9.47 टीएमसी पाणीसाठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Khadakwasala Dam

खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस.

खडकवासला धरण साखळीत जोरदार पावसाची हजेरी; धरणांत 9.47 टीएमसी पाणीसाठा

किरकटवाडी - खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस बरसत असून, यावर्षी पहिल्यांदाच गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या चार धरणांत मिळून 9.47 टीएमसी (32.48%) पाणीसाठा झाला असून गतवर्षी याच दिवशी 8.63 टीएमसी (29.62%) इतका पाणीसाठा होता.

काल दिवसभर खडकवासला व पानशेत धरण परिसरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, रात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. आज सकाळपासूनच जोरदार संततधार पाऊस बरसत असल्याने धरणांतील पाणीसाठाही वाढत आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील चोवीस तासांत चार धरणांत मिळून 1.28 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. सध्या चार धरणांमध्ये 766 दशलक्ष घनफूट दाबाने पाण्याची आवक सुरू असून पावसाचा जोर वाढताना दिसत आहे.

खडकवासला प्रकल्पातील पाऊस व पाणीसाठा

धरणाचे नाव/आजचा पाऊस (मिलिमीटर)/एकूण पाऊस (मिलिमीटर)/उपलब्ध पाणीसाठा (टीएमसी)/टक्केवारी

खडकवासला/22/187/1.49/75.60

पानशेत/84/831/3.45/32.41

वरसगाव/75/791/3.85/30.00

टेमघर/60/903/0.68/18.29

Web Title: Heavy Rain In Khadakwasala Dam Chain

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :rainKhadakwasala Dam