esakal | कात्रज कोंढवा परिसरात मुसळधार पाऊस | Katraj
sakal

बोलून बातमी शोधा

कात्रज कोंढवा रस्ता : पाऊस कोसळत असताना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले

Katraj : कात्रज कोंढवा परिसरात मुसळधार पाऊस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कात्रज : कात्रज कोंढवा रस्ता परिसरात काल शनिवारी पावसाने अक्षरशः हाहाकार माजविल्याचे पाहायला मिळाले. तीन ते चार तास पाऊस कोसळत होता. पावसामुळे अनेक सोसायट्याच्या पार्किंगमध्ये तसेच घरात पाणी घुसल्याने सगळीकडे हाहाकार माजला. कात्रज कोंढवा रस्त्यांवरील लेन क्रमांक ११ आणि १२मध्ये तर रस्त्याला ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे प्रशासनाने मोठ्या पावसामुळे निर्माण होणार्‍या परिस्थितीवर कायमस्वरूपी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

हेही वाचा: 'स्वखर्चाने घेतलीय लस; हटवा मोदींचा फोटो'; हायकोर्टात याचिका

कात्रज कोंढवा रस्त्याची झालेली दुरवस्था आणि त्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पाणी साचले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. चार ते पाच तास वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. पावसाने कात्रज, कोंढवा, भारती विद्यापीठ, गोकुळनगर, सुखसागर नगर आदी भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. पाण्याचा दाब अधिक असल्याने चेंबर झाकणे आपोआप बाजूला होऊन त्यातुन पाणी ओसंडून बाहेर वाहण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

loading image
go to top