
Pune Heavy Rain
sakal
पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ५५ महसूल मंडळात अतिवृष्टी (६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस) झाली, तर जिल्ह्यातील २६ धरणांपैकी १७ धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे. दौंड तालुक्यातील बोरी पारधी येथेही ढगफुटी झाली.