pune rainsakal
पुणे
Pune Rain : पुण्यात पावसाची दमदार हजेरी; जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’
पुणे शहरात सायंकाळच्या सुमारास मध्यवर्ती भागासह उपनगरांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या सरी कोसळल्या.
पुणे - शहरात शनिवारीही पावसाने दमदार हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास मध्यवर्ती भागासह उपनगरांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे मध्यवर्ती भागात शालेय साहित्याची खरेदी आणि संकष्टी चतुर्थीनिमित्त ‘श्रीं’च्या दर्शनासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.