Pune Rains : पुण्यात पुन्हा मुसळधार पाऊस; रस्त्यांवर पाणीच पाणी!

टीम ई-सकाळ
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

- काही ठिकाणी झाडांची पडझड.

- रस्त्यांवर पाणीच पाणी.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यातच आता पुण्यात पुन्हा मुसळधार पाऊस बरसला. या अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. काही भागातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे.

दुपारपासून प्रचंड उन्ह, उकाड्यामुळे पुणेकर चांगलेच त्रस्त झाले होते. मात्र, सायंकाळनंतर ढग दाटून आले होते. त्यानंतर आज सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पुण्यातील काही भागांत मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे पुणेकरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. 

पुण्यातील पावसाची परिस्थिती :

- सिंहगड रस्त्यावर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरवात. परिसरातील वीज पुरवठाही खंडित.

- खडकवासला, उत्तमनगर परिसरात जोरदार पावसाला सुरवात.

- खडकीत मुसळधार पावसाला सुरवात

- धनकवडीत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस

- घोरपडी परिसरात ढगांच्या गडगडाटसह मुसळधार पावसाला सुरवात

Vidhan Sabha 2019 : आदित्य ठाकरे म्हणाले, हे आहे माझे स्वप्न...

- सारसबागजवळ झाड पडल्याने परिसरात वाहतूक कोंडी. 

- आनंदनगर येथील चिंचणीकर रुग्णालयाजवळ झाड पडले. भा. द. खेर चौकात वाहतूक कोंडी. तसेच माणिक बाग येथेही सांडपाणी वाहिनीची झाकण तुंबल्याने पाणी साचण्यास सुरवात.

- पुणे स्टेशन, कॅम्प (लष्कर) परिसरात जोरदार पाऊस सुरु. अर्ध्या तासापासून सतत पडतोय पाऊस.

- ग्राहक पेठसमोर वडाचे मोठे झाड पडले बसवर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain with Lightning in Pune Various Area