अबब ! 73 वर्षांनंतर पुण्यात जानेवारीत पडला सर्वाधिक पाऊस

योगीराज प्रभुणे
Friday, 8 January 2021

पुण्यातील औंध, विश्रांतवाडी, कोथरूड, हडपसर, बिबवेवाडी, बाणेर, बालेवाडी, खडकवासला, शिवणे, उत्तमनगर परिसरात पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची धांदल उडाली.

पुणे : पुण्यात 1951 ते 1980 दरम्यान जानेवारीत एकही दिवस पाऊस पडला नाही, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. पुण्याच्या हवामान इतिहासात 1948 साली सर्वाधिक म्हणजे 35.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यातही 23 जानेवारी 1948 रोजी 22.3 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. 1980 ते 2009 या 29 वर्षातील माहिती हवामान खात्याकडून उपलब्ध झाली नाही. त्यामुळे प्राप्त माहितीनुसार पुण्यात  जानेवारी महिण्यात सध्या 1948 नंतरचा मोठा पाऊस पडला, असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले. 

तब्बल नऊ महिन्यानंतर महाविद्यालये होणार सुरु

पुण्यात पुन्हा पावसाळा आलाय. गेल्या दहा वर्षांमध्ये जानेवारीत पडलेल्या पावसाची बेरीज केली तरीही ती 0.8 मिलीमीटरपेक्षा जस्त होत नाही. या वर्षी अक्षरशः कमाल झाली. शुक्रवारी दुपारी दोन तासांमध्ये धुवाधार पावसाच्या सरी पडल्या. शिवाजीनगर येथे दुपारी अडीच वाजेपर्यंत 2.7 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला.

पुण्यात जानेवारीमध्ये एकही दिवस पाऊस पडत नाही, असा 1958 पासूनचा हवामानाचा इतिहास आहे. हे वर्ष मात्र, त्याला अपवाद ठरत असल्याचे दिसते. शुक्रवारी साडेआठ वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे 3.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पाषाणमध्ये पावसाच्या जोरदार सर पडली. त्यामुळे तेथे 5.2 मिलीमीटर पावसाची नोंदला गेला. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. शहरात सूर्यदर्शन झाले नाही. हवेतील आद्रेतेचे प्रमाणही वाढले. त्यामुळे दुपारी एक वाजल्यापासून शहराच्या मध्य वस्तीसह उपनगरांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. पावसाचा जोर इतका भयंकर होता की, अर्ध्या तासातच रस्त्यांवरून पावसाच्या पाणी वाहू लागले. रस्त्यांना अक्षरशः ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले. अचानक आलेल्या पावसाने रस्त्यावर असलेल्या पुणेकरांची धांदल उडाली. दुचाकी चालक रस्त्याच्या कडेला मिळेल त्या सुरक्षेच्या जागी जाऊन थांबल्याचे चित्र शहरात दिसत होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुरवातीला पावसाचा जोर कमी होता. त्यामुळे छत्री घेऊन तुरळक पावसात दैनंदिन काम करत फिरणारे पुणेकर रस्त्यावर दिसत होते. पण, त्यानंतर लगेचच पावसाचा जोर वाढला. धुवाधार पावसाला सुरवात झाली. वाहन चालवताना पुढे दिसत नव्हते, इतक्‍या जोरदार सरींनी पुणेकरांना झोडपले. दोन तासांनंतर पावसाचा जोर कमी झाला. 

थंडीचा काढता पाय... 
पुण्यात शुक्रवारीही गेल्या तीन-चार दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी झाला. किमान तापमानाच्या पाऱ्याने 19.1 अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली. त्यामुळे जोनवारीमध्ये पहाटे जाणवणाऱ्या कडाक्‍याच्या थंडीने काढता पाय घेतला. 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in pune

Tags
टॉपिकस
Topic Tags: