
पुणे : विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी (ता. ९) दुपारनंतर शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांत जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पुणेकरांची एकच धांदल उडाली. यावेळी सलग दोन ते अडीच तास झालेल्या पावसाने रस्त्यावर पाणी साचले; तर मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. सायंकाळी सहापर्यंत शिवाजीनगरला सहा, तर पाषाणला पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली. येत्या आठवडाभर आकाश ढगाळ राहून हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.