landslide on Shivneri Fort by heavy rain
sakal
जुन्नर - जुन्नर शहर व पश्चिम आदिवासी भागात गेले दोन दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाने छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर गेल्या दोन दिवसात तीन वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्यामुळे पावसाचा जोर ओसरेपर्यंत पुढील काही कालावधीपर्यंत किल्ले शिवनेरीवर शिवभक्त व पर्यटक यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाकडून प्रवेश बंदी करण्यात आली आहे.