
Ambegaon Rain
Sakal
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे डिंभा, घोडेगाव, मंचर , कळंब या मंडल विभागात आकडेवारीनुसार अतिवृष्टी झाली असल्याची माहिती तहसीलदार संजय नागटिळक यांनी दिली. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात भीमाशंकर, आहुपे व पाटण खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे घोड नदी व बुब्रा नदी नदीला मोठा पूर आला आहे. आदिवासी भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. धरणाचा पाणीसाठा शंभर टक्के झाला असून दुपारी १२ वाजेपर्यंत धरणातून 3२ हजार क्युसेक ने पाणी सोडण्यात येत होते . पावसाचे पाणी नदीपात्रात दुपारी सव्वा एक वाजता वाढल्याने 3४ हजार क्युसेक पाणी धरणातून सोडण्यात येत आहे. पाणी सतत वाढत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.