
Pune Traffic Jam
sakal
पुणे : शहरात सोमवारी सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्यांना पुन्हा एकदा वाहतुकीच्या कोंडीचा त्रास सहन करावा लागला. शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही मिनिटांचा प्रवास तासाभराचा ठरला, तर अनेक ठिकाणी वाहनचालक कोंडीत अडकल्याचे पाहायला मिळाले.