Pune Rain : पुण्यात आज धुवाधार पावसाचा इशारा

पुण्यासह सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मंगळवारी (ता. ९) धुवाधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून उर्वरित संपूर्ण महाराष्ट्राला जोरदार पावसाचा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा ‘येलो अलर्ट’ सोमवारी हवामान खात्याने दिला.
Pune Rain
Pune Rainsakal
Updated on

पुण्यासह सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मंगळवारी (ता. ९) धुवाधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून उर्वरित संपूर्ण महाराष्ट्राला जोरदार पावसाचा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा ‘येलो अलर्ट’ सोमवारी हवामान खात्याने दिला.

का वाढला पावसाचा जोर?

  • मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीपासून दक्षिणकडे सरकला आहे. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या जैसलमेरपासून, चित्तोडगड, रायसेन, मंडला, रायपूर, कलिंगापट्टनम ते मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

  • गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीसाठी चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

  • दक्षिण महाराष्ट्रात परस्पर विरोधी वाहणाऱ्या पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र तयार झाले आहे.

दृष्टीक्षेपात राज्यातील पाऊस

  • राज्यात आठ जुलैला एका दिवसात सरासरी ११.३ मिलिमीटर पाऊस पडतो. सोमवारी (ता. ८) एका दिवसांत २४.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

  • राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत ३११.८ मिलिमीटर पाऊस पडला. राज्यात एक जून ते आठ जुलैदरम्यान सरासरी २८९ मिलिमीटर पाऊस पडतो. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत आठ टक्के पाऊस पडला आहे.

  • राज्यात नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये तेथील सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

  • राज्यात सर्वाधिक पाऊस सोलापूर जिल्ह्यात नोंदला गेला. तेथे सरासरीच्या (१२२ मिलिमीटर) ९९ टक्के (२४३.३ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.